पनवेल दि.4 : एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, कवयित्री, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जन्मदिनाचे दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व पनवेल महानगर पालिका यांचे संयुक्त विद्यमाने ’चेरी ब्लॉसम’ या रोटरी प्रकल्पा अंतर्गत के व्ही कन्या शाळेतील आठवी व नववी तील विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरासाठी रोटरी चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, पनवेल महानगर पालिका आरोग्य विभागाच्या डॉ. सौ. रेहाना मुजावर, के व्ही कन्या शाळा कमिटी चेअरमन प्रितम म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे आरोग्य संचालक डॉ. लक्ष्मण आवटे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुविद्याताई वाजेकर यांचे सह शाळेतील इतर शिक्षक वर्ग, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, खजिनदार ऋषिकेश बुवा यांचे सह माजी अध्यक्ष, रोटरी सदस्य, रोटरी एन्स यांची प्रमुख उपस्थिती होती. या हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचा 430 विद्यार्थिनींनी लाभ घेतला. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी होते त्यांना डॉ. गिरीश गुणे व डॉ. रेहाना मुजावर मॅडम यांनी आहारा विषयी मार्गदर्शन केले. पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोफत औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विलेस्टा हेल्थकेअर प्रा. लि., फ्रँको फार्मासियूटीकल लप्रा. लि., ऍपेक्स लॅब. प्रा. लि. चे शिडीस विभाग व आयुषन फार्मासयिु्टकल्स प्रा. लि.आदी कंपनींचे योगदान मिळाले.