पनवेल दि.४: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील स्पर्धेप्रमाणे यंदाही भव्य स्वरूपात विविध क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव अर्थात ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली नियोजन बैठक पार पडली.
उलवा नोडमध्ये झालेल्या या बैठकीस टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भार्गव ठाकूर, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपसरपंच विजय घरत, अमर म्हात्रे, सुर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, किशोर पाटील, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, मयूर कदम, विवेक होन, खारघर युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेश पाटील, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांनी स्पर्धेच्या नियोजनाबाबत विविध स्पर्धा समितीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांनी पुढे बोलताना सांगितले कि, सीएम चषक त्यानंतर मागील वर्षी नमो चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि खेळाडूंना वाव देणारी ठरली. नमो चषक २०२४ स्पर्धा राज्यातील प्रत्येक तालुक्यात संपन्न झाली. त्या स्पर्धेत पनवेल विधानसभा मतदार संघात ०१ लाख १३ हजार २७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन पनवेलने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला होता. मागील नमो चषक महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो-खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य, अशा २१ प्रकारात स्पर्धा झाल्या. यंदा नमो चषक २०२५ स्पर्धा अधिक उत्साहाने आणि भव्य स्वरूपात होणार आहे. विविध स्पर्धांसोबत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व नमो चषक स्पर्धेचे यंदाही योग्य नियोजन व यशस्वी आयोजन झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक समितीने आपापल्या समितीचा नियमित आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी समित्यांना या बैठकीच्या माध्यमातून केली.

🛑न्यू मुंबई इंग्लिश स्कूल कळंबोलीचे स्नेहसंमेलन जल्लोषात !
🛑संविधानाने दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर सावित्रीच्या लेकींनी पुढे यायला पाहिजे – कामगार नेते महेंद्र घरत !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!