कळंबोली दि.४: कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात पार पडले. स्नेहसंमेलनातून विद्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या विविध बहुरंगी सामूहिक नृत्यातून व कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत समाज प्रबोधन करण्यासाठी विविध संदेश देऊन पालक विद्यार्थ्यांना जागृत करण्याचे काम विद्यालयाने केले आहे .संस्थेचे अध्यक्ष संतोष बैजनाथ शुक्ला यांनी या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.
कळंबोली वसाहतीमध्ये तळागाळातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी न्यू मुंबई इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल मध्ये पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई आर एस पी चे समादेशक विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खारघर मधील बोनी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुनील बंधू, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना तोमर उपस्थित होते. तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने या स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते. स्नेहसंमेलनात नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध पथकथा, पथनाट्य, सामूहिक नृत्य, छोट्या नाटिका ,वात्रटिका सादर करून पालकांचे प्रबोधन केले. स्त्री भ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा, सोशल मीडियाचा अतिवापर याबाबत जनजागृती व प्रबोधन करणाऱ्या नृत्य व नाटिका सादर करून विद्यार्थी आणि पालकांचे मनोरंजन केले. मुलांनी केलेल्या विविध बहुरंगी सामूहिक नृत्याची पालकांनी भरभरून दाद देऊन टाळ्यांच्या कडकडाट त्यांचे जल्लोषात अभिनंदन आणि स्वागतही केले. स्नेहसंमेलनामध्ये उत्कृष्ट नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचेही यादरम्यान स्मृती चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला .बेस्ट टीचर व बेस्ट स्टुडन्ट ना विशेष सन्मानित यावेळी करण्यात आले. स्नेहसंमेलनातून समाज मन जपून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक संदेश देऊन स्नेहसंमेलनात पालक विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेऊन विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात साजरे केल्याबद्दल विद्यालयाचे व शाळेचे संस्थापक संतोष शुक्ला यांनी सर्वांचे आभार म्हणून समाधान व्यक्त केले.

🛑संविधानाने दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर सावित्रीच्या लेकींनी पुढे यायला पाहिजे – कामगार नेते महेंद्र घरत !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!