कळंबोली दि.२२: आरोग्यम् धनसंपदा आणि हेल्थ इज वेल्थ अस आपण सहज म्हटलं जातं. परंतु यासाठी शरीराची तेवढी निगा कस नियमित व्यायाम करून आरोग्य हे धनसंपदेमध्ये परावर्तित केलं जातं याचीच प्रतीची तळोजातील भेल कंपनीमध्ये कार्यरत असलेले 58 वर्षीय तरुण संतोष तेलंगे या तरुणाने 21 किलोमीटरचे मॅरेथॉनचे अंतर लीलया पार करून तरुणांना लाजवेल अशीच कामगिरी करून दाखवली आहे. इंडियन नेव्ही ने मुंबईत आयोजित केलेल्या 21 किलोमीटर मॅरेथॉन शर्यतीचे अंतर त्यांनी लिलया कुठेही न थांबता पार करून भेल कंपनीचे नाव उज्वल केले आहे. तसेच 58 वर्षांमधील आरोग्याचा असलेला फिटनेस हा त्यांनी दाखवून तरुणांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.
संतोष तेलंगे हे 58 वर्षीय क्रीडापटू तळोजातील भेल कंपनीमध्ये कार्यरत आहेत.कंपनीत कार्यरत असतानाच ते आपल्यातील खेळाडू व क्रीडापटू कायम कार्यरत ठेवत आहेत. कंपनीच्या वतीने त्यांनी विविध मॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभाग घेऊन कंपनीचे नाव उज्वल केले आहे. रविवारी मुंबई येथे इंडियन नेव्ही ने आयोजित केलेल्या 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. क्रॉस मैदान ते चर्चगेट स्थानका दरम्यानची 21 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा सर्वांनाच आकर्षण करून गेली आहे. या मॅरेथॉन मध्ये राज्यभरातील तब्बल ५३३८ धावपटू सहभागी झाले होते. रविवारी सकाळी ५ वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला होता. संतोष तेलंगे यांनी २१.१ कि.मी. मॅरॅथॅान च अंतर २ तास ३४ मीनिटात पुर्ण केल आहे. आत्ता पर्यंत मी १० किमी – १, २१.१ किमी – ५ व ५० किमी च्या ३ मॅरॅथॅान पुर्ण केल्या आहेत. इंडियन नेव्ही ने आयोजित केलेली ही दुसरी मॅरॅथॅान आहे. संतोष तेलंगे यांनी हिमगिरी ट्रेकर्स नावाची संस्था ही स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते राज्यभरातील तरुण-तरुणी,आबाल वृद्धांना बर्फाळ प्रदेशात,दऱ्याखोऱ्यात, डोंगरदऱ्यात, गड किल्ल्यांवर ट्रेकिंग साठी घेऊन जात असतात. हजारो नागरिकांनी त्यांच्या समवेत ट्रेकिंगचा थरारक अनुभव व आनंद घेतलेला आहे.मॅरेथॉन चे अंतर पूर्ण केल्याबद्दल त्यांचे इंडियन नेव्ही च्या वतीने विशेष मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
