पनवेल दि.१३: रांची येथे ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत खारघरच्या १७ वर्षीय आभा सोमण हिने ५ पदकांची लयलूट करत घवघवीत यश संपादन केले. आभाने या स्पर्धेत १ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकून ‘नॅशनल चॅम्पियन’ बनण्याचा बहुमान मिळवला.
या स्पर्धेत आभाने केरीन प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तर टीम स्प्रिंट, टीम पर्सूट आणि स्प्रिंट प्रकारात रौप्य, आणि १ किमी टाईम ट्रायलमध्ये कांस्य पदक मिळवून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
टीम पर्सूट प्रकारात महाराष्ट्राच्या संघातून खेळताना आभा सोमण, मानसी महाजन, श्रावणी कासार आणि प्राजक्ता सूर्यवंशी यांनी जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. मात्र, याच शर्यतीत राजस्थानच्या संघाने महाराष्ट्रापेक्षा कमी वेळ नोंदवल्यामुळे नवीन राष्ट्रीय विक्रम राजस्थानच्या नावावर नोंदवला गेला. महाराष्ट्राच्या मुलींनी दिलेली ही फाईट अत्यंत कौतुकास्पद ठरली.
सायकलिंगमधील करिअरसाठी आभाने ५ वर्षांपूर्वी खारघर सोडून पुण्याचा रस्ता धरला. तिने पुण्यातील दर्शन बार्गुजे यांच्या ‘फीनिक्स सायकलिंग अकॅडमी’मध्ये प्रवेश घेतला.
२०२६ मध्ये आभाने ३ आंतरराष्ट्रीय पदके देखील पटकावली आहेत. आभाच्या या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचालीत तिचे कोच दिपाली शिळदनकर, क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या दिपाली पाटील आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव संजय साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

♦️पनवेलमध्ये रंगला बासरीच्या सुरांची भुरळ घालणारा ‘अमरबन्सी’ सांगीतिक सोहळा

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133