कळंबोली दि.९ (दीपक घोसाळकर) : पावसाळा संपल्यानंतर तीव्र पाणीटंचाईला कळंबोलीकरांना साम्य सामोरे जावे लागले आहे त्यातच आता दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्याचाही सामना कळंबोली वासीयांना करावा लागत आहे. जलवाहिनी लगत असलेल्या मलनिसारण वाहिनीचे पाणी घुसल्याचा दाट संशय व्यक्त केला जात असून त्याची खातरजमा करून लवकरच योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे ठोस आश्वासन कळंबोलीचे सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख प्रफुल्ल देवरे यांनी दिल आहे. तर सिडको करून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आमचे आरोग्य धोक्यात आले असून पाणी पिण्याचे तर लायकीचे नाहीत परंतु अंगावर घेण्याचे सुद्धा नसल्याची खंत येथील रहिवासी सुधाकर जैवल यांनी व्यक्त केली आहे.
कळंबोली वासीयांना एनकेन प्रकाराने पाण्याच्या विविध समस्यांना वारंवार सावरमोरे जावे लागत आहे.कधी तीव्र पाण्याची टंचाई,कधी गढूळ पाणी, दूषित पाणी, कधी पाणीचा पाण्याचा खेळ खंडोबा कळंबोलीकर्‍यांच्या पाचवीला पुजला आहे. आता तर कळंबोलीतील रहिवाशांना थेट दूषित पाणीपुरवठा होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडकोने पाठवलेले पाणी दूषित तर आहेच परंतु आंघोळ करण्याच्या पात्रतेचे नसल्याची ही खंत रहिवाशी व्यक्त करीत आहेत.पाण्यामध्ये चिकट सारखा माती मिश्रित द्राव हा पाण्यासोबत येत आहे. त्यामुळे पाणी अंगावर कसे घ्यायचे त्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे.गेल्या आठ ते दहा दिवसापासून कळंबोलीतील सेक्टर एक मधील के एल सिक्स या भागातील रहिवाशांना असा दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडको द्वारे येणारे पाणी येथील नागरिक पीत नाहीत पिण्यासाठी वारंवार पाणी बाहेरून विकत घ्यावे लागते. तर नळाद्वारे आलेले पाणी चांगले येईल चांगले येईल यासाठी तब्बल 15 ते 20 मिनिटात किंवा अर्धा तासापर्यंत पाणी असेच सोडावे लागते. त्यानंतर पाणी चांगले थोड्याफार प्रमाणात येते. अशा विविध समस्यांना कळंबोलीतील रहिवाशांना आता सामोरे जावे लागत आहे.येथील रहिवासी सुधाकर जैवल यांनी तर सदरच्या पाण्याबाबत चे व्हिडिओ काढून सर्वत्र व्हायरल करून प्रशासनाला जाब विचारला आहे. विधान परिषदेमधील आमदार विक्रांत पाटील यांच्याकडेही सदरचे पाण्याचे फोटो व व्हिडिओ पाठवून ठोस कारवाई करण्याची मागणी ही केलीआहे.याबाबत कळंबोलीतील सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी प्रफुल्ल देवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. त्वरित याची खाततरजमा करण्यासाठी जलवाहिनी तपासून जलवाहिनी मध्ये कुठे मल निसारण वाहिनीचे पाणी तरी घुसत नाही ना याची निश्चितपणे खातरजमा करून योग्य ती कारवाई करून शुद्ध निर्मळ पाणीपुरवठा कसा होईल हे निश्चित पाहिले जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल असे ठोश आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.एकीकडे पनवेल महापालिका लाऊड स्पीकर वरून विविध आजारांबाबत काळजी घेण्याबाबतचे जाहिरात ही करत आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक असलेले पाणी जर दूषित येत असेल तर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित कसे राहणार असा यक्ष प्रश्नही रहिवासी सुधाकर जैवल यांनी व्यक्त केला आहे. सिडको ने स्वच्छ निर्मळ पुरेसं आणि आरोग्याला योग्य असेच पाणीपुरवठा करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

📡थेट प्रक्षेपण : दिवाळीच्या मंगलमय पर्वातील पहाट ‘दिवाळी पहाट २०२६’
🛑दिवाळीच्या निमित्ताने जगातील सर्वात उंच इमारत सुंदर रोषणाईने उजळून निघाली

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133