यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी
ठाणे दि.८: नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा खरा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो. नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने प्रत्येकीला आनंद होत असतो. इथे वस्त्र किती किंमतीचे आहे हा प्रश्न नसतो. केवळ रंगाने एकता निर्माण होत असते. त्याच रंगाचे वस्त्र परिधान केले नसले तरी पाप लागत नसते, किंवा नेसले तर पुण्य मिळत नसते ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी आहे. उत्सव हे आनंदप्राप्तीसाठीच असतात. हे रंग वारांवर ठरविले जात असतात.

शारदीय नवरात्र २०२६ (११ ते १९ ऑक्टोबर २०२६) मधील नऊ दिवसांचे रंग खालीलप्रमाणे आहेत:

  • ११ ऑक्टोबर २०२६ (रविवार): केशरी (पहिला दिवस – मां शैलपुत्री)
  • १२ ऑक्टोबर २०२६ (सोमवार): पांढरा (दुसरा दिवस – मां ब्रह्मचारिणी)
  • १३ ऑक्टोबर २०२६ (मंगळवार): लाल (तिसरा दिवस – मां चंद्रघंटा)
  • १४ ऑक्टोबर २०२६ (बुधवार): शाही निळा (Royal Blue) (चौथा दिवस – मां कूष्मांडा)
  • १५ ऑक्टोबर २०२६ (गुरुवार): पिवळा (पाचवा दिवस – मां स्कंदमाता)
  • १६ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार): हिरवा (सहावा दिवस – मां कात्यायनी)
  • १७ ऑक्टोबर २०२६ (शनिवार): राखाडी (Grey) (सातवा दिवस – मां कालरात्री)
  • १८ ऑक्टोबर २०२६ (रविवार): जांभळा (Purple) (आठवा दिवस – मां महागौरी)
  • १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार): मोरपंखी हिरवा (Peacock Green) (नववा दिवस – मां सिद्धिदात्री)

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133