पनवेल दि.०२ (हरेश साठे) : दानशूर व्यक्तिमत्व आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे थोर समाजसेवक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे अर्थात अमृत महोत्सवी वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिष्टचिंतन करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
समाजसेवा, दातृत्व, नेतृत्व आणि लोककल्याणाचा अखंड वसा जपत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या जीवनातील ७५ वर्षांचा अमृतमहोत्सवी टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून जनमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे. गरजू, वंचित आणि कष्टकरी घटकांना आधार देत शिक्षण, आरोग्य आणि समाजविकासासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आणि अनुकरणीय मानले जाते. साधेपणा, विनम्रता आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता यांमुळे ते केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे खरे लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून समाजसेवेच्या या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन झाले. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे भव्य स्वरूपात हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे. राजकीय व आर्थिक शक्ती लोक कल्याणासाठी सार्थकी लावणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा माणसावर अधिक विश्वास आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाला काय हवे याची जाणीव त्यांना कायम राहिली. स्वतःच्या खिशातून जास्तीत जास्त मदतीचा हात देण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे. वयाच्या ७५ वर्षीही त्याचे सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात आणि तळागाळातही त्यांच्या विचारांचा पगडा कायम आहे. विविध क्षेत्रातील योगदान आणि दानशूरता यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाजाने “लोकमान्य लोकनेता” अशी उपाधी बहाल केली आहे. त्यांचा आदर्श घेऊन हजारो जणांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. सामान्य माणूस त्यांचा केंद्रबिंदू राहिला आहे, त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घर केले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जात, पात, धर्म, पक्ष असा कधीही भेदभाव मानला नाही. आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि त्यामुळे माणुसकी हाच त्यांचा धर्म कायम राहिला आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लोकांप्रती असलेली त्यांची समर्पण भावना खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराचे पान आहे. त्यांची कीर्ती महान आणि सर्व समाजाला मार्गदर्शक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची हजारोंच्या संख्येत अर्थात अफाट गर्दी केली होती. दरम्यान अमृत महोत्सवी वर्ष प्रचंड प्रमाणात विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्यातील मंत्री महोदय गणेश नाईक, भरतशेठ गोगावले, आदितीताई तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, तसेच कोकणातील सर्व आमदार आणि विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि दहा हजारहून नागरिक हितचिंतकांच्या उपस्थितीत (१३ मे) लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा उलवे नोडमध्ये भव्य असा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. तसेच वर्षभरात झालेल्या कार्यक्रमात भव्य कीर्तन महोत्सव, जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी कर्करोग तपासणी विशेष शिबीर, रोजगार मेळावा, शिधा वाटप, नाट्य महोत्सव, वृक्षारोपण, ७५ अभंगांचे लोकार्पण, आगरी कोळी महोत्सव, श्रीरामार्पण सांस्कृतीक सोहळा, संगीत मॅरेथॉन, व्याख्याने, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, अभिनय स्पर्धा, कमी संमेलन, परिसंवाद, सन्मान सोहळा, सामूहिक बासरी वादन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, प्रोग्रॅम कार्ड डेकोरेशन, राज्यस्तरीय निवड कबड्डी स्पर्धा आणि प्रशिक्षण, विमा पॉलिसी वाटप, बॅडमिंटन स्पर्धा, बॉक्सिंग स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, अशी विविध कार्यक्रम उत्कृष्ट आयोजनात पार पडली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम आयोजित करून अमृत महोत्सवी वर्षाचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित झाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!