लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कोकण मराठी साहित्य परिषदेला २५ लाखाची देणगी जाहीर
पनवेल दि.२७: साहित्यिक आणि लोककलावंतांमध्ये मनापासून रमणारे लोकनेते, असे गौरवोद्गार पानिपतकार तथा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याविषयी काढले. कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा आणि नवीन पनवेल शाखेच्यावतीने लोकनेते,माजी खासदार तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त “एक कृतार्थ संध्याकाळ” या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून पानिपतकार विश्वास पाटील बोलत होते.
या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ कवी व चित्रपट निर्माते दिग्दर्शक रामदास फुटाणे,सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर,कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कोमसापचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ,ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, युवा नेते नगरसेवक परेशशेठ ठाकूर,महापौर नितीन पाटील, भाजपा नेते वाय.टी.देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पनवेल पंचायतीच्या सभापती रंजना वासकर, सुप्रसिद्ध गझलकार ए.के.शेख तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रा.एल.बी.पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश बिनेदार,कोमसापचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ,नवीन पनवेल कोमसापचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्यासह लोकप्रतिनिधी, साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते.
यापुढे बोलताना पानिपतकार विश्वास पाटील म्हणाले,तळ्यांनी आणि कमळांनी फुलून-उमलून आलेले गाव म्हणजे पनवेल आणि या पनवेल गावातील सुवर्णकमळ हे लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत.निष्ठेने माणूस मोठा होतो,त्याचे कर्तुत्वही मोठे असते. लोकनेते रामशेठ ठाकूर हे गरिबीतून वर आलेत.आपल्या गरिबीचे नाद,निनाद,स्पंद आणि त्या हाका,ती जाणीव ही सगळी आपल्या हृदयात आहे,ती अशीच ठेवावी.गोरगरिबांच्या सेवेत नेहमी तुम्ही सहभागी होता, ही अशीच सेवा यापुढेही सुरू ठेवावी अशी त्यांनी सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या भाषणात, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कर्तृत्व,दातृत्व आणि नेतृत्व पाहता त्यांना लोकनेता नाही तर समाजनेता म्हटले पाहिजे. समाजाप्रती अशी माणसे निर्माण झाली पाहिजेत.ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाचे कल्याण झाले पाहिजे,त्या समाजाचे भवितव्य घडले पाहिजे ही आकांक्षा रामशेठ ठाकूर यांच्या मनामध्ये आहे असे सांगून रामशेठ ठाकूर यांना अमृतसर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध राजकीय व्यंगकवी रामदास फुटाणे यांनी आपल्या भाषणात,बहुजनांच्या मुलांनी, तरुणांनी कसा संघर्ष केला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामशेठ ठाकूर.पनवेलची महत्वाची ओळख म्हणजे रामशेठ ठाकूर. रामशेठ ठाकूर यांच्या स्वभावाची नम्रता आपण बाकी जणांनी स्वीकारली पाहिजे हा त्यांचा महत्त्वाचा गुण आहे असे त्यांनी सांगितले.
लोकनेते माजी खासदार कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात, साहित्य समाज घडवण्याचे काम करतो.साहित्यिक स्फूर्ती देतात, उभारी देतात. साहित्यिकांच्या शुभेच्छांमुळे निश्चितच माझे आयुष्य वाढेल. आयुष्यात गरिबी,श्रीमंती,कष्टाचे अनुभव मी पाहिले आहेत.रयत शिक्षण संस्थेमुळे संस्कार मिळाले. आपण प्रामाणिकपणे काम केले तर एक यशस्वी नागरिक होऊ शकतो.लोकांनी मला रामशेठ बनवले,पण मी अजूनही रामशेठ झालो नाही.पैसे कमवले पण वृत्तीने आणि भावनेने मी शेठ झालो नाही.साहित्यिकांमुळे मी कृतार्थ झालो अशी शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेसाठी २५ लाखाची देणगी जाहीर केली.
यावेळी सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर,अरुण म्हात्रे,कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांची भाषणे झाली.कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी संपादन केलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासावरील ७५ कवितांचा लोकनेता या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. काव्यश्री या शुभांगी म्हात्रे यांच्या काव्यसंग्रहाचे तसेच डॉ.शैलजा करोडे यांच्या मेंदीच्या पानावर या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन प्रा. चंद्रकांत मढवी यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!