पनवेल दि.३०: बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात या व्यक्तीवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने रविवार, दिनांक २९ मार्च रोजी संविधान कट्टा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली.
समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात एकत्र येऊन जागृती निर्माण करण्याचा निर्धार उपस्थितांनी या प्रसंगी व्यक्त केला.
या वेळी मारुती शेरकर, अरविंद लोहार, विजय मोरे आणि प्रवीण जठार हे उपस्थित होते. त्यांनी संविधानाच्या मूल्यांवर आधारित सामाजिक परिवर्तनाची गरज अधोरेखित करत, दोषींवर तातडीने कारवाई व्हावी अशी ठाम मागणी केली. दरम्यान, “अंधश्रद्धा मोडू या, विचारांनी जोडू या!” अशा घोषणा देण्यात आल्या .
ही सभा शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून, उपस्थित संविधानप्रेमी नागरिकांनी आगामी काळात अंधश्रद्धा आणि महिलांवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा संकल्प केला.
![]()
