पनवेल दि.३१: सामाजिक, शैक्षणिक, कला, संस्कृती, क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दैनिक लोकमत वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल परिसरातील विविध क्षेत्रांमधील कर्तृत्ववान महिलांचा शुक्रवारी आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दै. लोकमतचे उपाध्यक्ष निनाद देसाई, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सन 1996पासून विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. सावित्रीबाई नसत्या, तर महात्मा फुलेंचे कार्य समोर आले नसते. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचे कार्य किती मोठे आहे याची अनुभूती येते. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही नेहमीच पुढे आहोत. यापुढेही असेच पुढे राहू, असे अभिवचनही त्यांनी दिले.
दै. लोकमतने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळासोबत राबवलेल्या या सोहळ्याचे मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपले कर्तृत्व गाजवत आहेत. आज देशाचे सर्वोच्च समजले जाणारे राष्ट्रपतीपद द्रौपदी मुर्मू सांभाळत आहेत. यातून महिलांचे कर्तृत्व सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यादरम्यान गणेश वंदना आणि ओडिसी नृत्य सादर झाले. ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाच्या कलाकारांनी आपल्या नाटकाची तोंडओळखही उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन घाणेकर यांनी केले.

यांचा झाला सन्मान………………
वैद्यकीय शैक्षणिक विभाग :- डॉ. प्रज्ञा डोंगरगावकर, डॉ. रजनी मुल्लरपटण, डॉ. प्रभा दसीला, मनिषा बंड, डॉ. मानसी ठाकूर
वैद्यकीय विभाग :- डॉ. जयश्री पी. पाटील, डॉ. शोभना पालेकर, कीर्ती समुद्रा, डॉ. शुभदा नील
शैक्षणिक विभाग :- डॉ. निवेदिता श्रेयांस, डॉ. सीमा एन. कांबळे, वैशाली जगदाळे, ज्योत्स्ना भरडा, ओपन स्काय अकॅडमी, अनुष्का कोठेकर, राज अलोनी, डॉ. प्रणती टिळक
प्रशासन विभाग :- प्रिया रातांबे, वर्षा कुलकर्णी
मनोरंजन आणि सामाजिक सेवा विभाग :- कल्पना कोठारी, सिंधू नायर
वैद्यकीय आणि सामाजिक सेवा विभाग :- डॉ. सुप्रिया वाकचौरे
पत्रकारिता शैक्षणिक विभाग :- अपर्णा एस. कांबळे
व्यवसाय विभाग :- आस्मा सय्यद, वैशाली ठाकूर, तेजी घोष
व्यवस्थापन शिक्षण प्रशासन विभाग :- डॉ. अश्विनी आर्ते
व्यवसाय आणि साहित्यिक विभाग :- सीमा त्रिवेदी
कायदेशीर शैक्षणिक सामाजिक सेवा विभाग :- अ‍ॅड. शिल्पा नागावकर
सामाजिक सेवा विभाग :- सायली सरक, मानसी पाटील
पाककला विभाग :- सुषमा पोतदार
मायदेशी प्रशैक्षणिक विभाग :- रूपाली लांडगे
योगशिक्षिका विभाग :- गीता गुप्ता
जनशैक्षणिक विभाग :- कल्पना म्हात्रे
क्रीडा विभाग :- ऐश्वर्या महाडिक, स्वस्तिका घोष, स्नेहल पाटील
सांस्कृतिक विभाग :- हेमाली शेडगे
समाजसेवा-सनातन संस्था विभाग :- मोहिनी पांढरे
समाजसेवा विभाग :- वंदना पवार
मनोरंजन विभाग :- विजया बाबर

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!