पनवेल दि.०१: टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 मधील क्रिकेट प्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून या वर्षी हे 4थे वर्ष आहे. ही स्पर्धा 10,11,12 जानेवारी व 17,18,19 जानेवारी 2025 या दिवशी खेळवली जाणार आहे. रायगड रोटरी वरियार्स हे या स्पर्धेचे आयोजक असून या स्पर्धेत रोटरी 3131प्रांतातील 40 वर्ष्यावरील 78 रोटरी सदस्य खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत ते 78 सदस्य सहा विविध संघात प्रत्येकी 13 खेळाडू IPL धर्तीवर लिलाव (पैश्यांचा ऐवजी पॉईंट्स) पद्धतीने निवडले जातात.
या वर्षी या स्पर्धेचा लिलाव जय मल्हार हॉटेल च्या किनारा लॉन वर आमदार प्रशांत ठाकूर, रोटरी प्रांत 3131 चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश पोटे, मा.नगरसेवक गणेश कडू, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन चे माजी अध्यक्ष विजय निगडे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी चे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव यांचे उपस्थितीत अतिशय दिमाखदार सोहळ्यात पार पडला. यावेळी टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 च्या ट्रॉफी चे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी आमदारांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. आपापले व्यवसाय,समाजसेवा करणे सांभाळून आपल्या फिटनेस ची काळजी घेत खेळाचे मैदान गाजवा असे आवाहन सर्व खेळाडूंना केले. माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांनी सर्व खेळाडूंनी दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही दिमाखदार खेळ करा असे सांगून शुभेच्छा दिल्या.
विविध संघ व त्यांचे कर्णधार खालील प्रमाणे
1) बीकेसी संघ मालक रो. भाऊ कोकणे, कर्णधार अविनाश बारणे
2) प्राईम दादा संघ मालक रो. दादा दिवटे, कर्णधार विजय कोतवाल
3) रिवेल विनर संघ मालक रो.महेश घोरपडे, कर्णधार अरविंद चौहान
4) बाश्री संघ मालक प्रशांत तुपे, कर्णधार सिकंदर पाटील
5) पिंपरी एलीट इगल संघ मालक चंदू पाटील, कर्णधार योगेश वाघ
6)आर. आर. फायटर्स संघ मालक राहुल टिळेकर, कर्णधार राहुल कामठे
या संघात सर्व 78 सहभागी खेळाडूंची विभागणी करण्यात आली.
या स्पर्धेचे टीआयपीएल हे मुख्य प्रयोजक असून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी हे सह प्रयोजक आहेत. हा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरी रायगड वारियर्स संघांचे अध्यक्ष गणेश कडू, सचिव डॉ. संतोष जाधव, खजिनदार अतिश थोरात यांचे सह सतिश देवकर, पंकज पाटील, देवेंद्र चौधरी, प्रितम कैय्या, सुदीप गायकवाड, ऋषी बुवा, अमित पुजारी, डॉ. आमोद दिवेकर, विकेश कांडपिळे, संतोष घोडिंदे, विनोद भोईर, आनंद माळी, पुष्कराज जोशी आदी सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली.