उलवा, १६ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांचे वडील दिवंगत तुकाराम नारायण घरत यांचा आज दहावा स्मृतिदिन भक्तिमय वातावरणात साजरा
करण्यात आला. यावेळी महेंद्र घरत आणि शुभांगी घरत, कुणाल घरत, सेजल घरत यांनी स्वर्गीय तुकाराम घरत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. “माझ्या वडिलांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय भाग घेतला, एक वर्ष बेळगावात कारावास भोगला. त्यावेळी समाजासाठी आई-वडिलांनी खूप केले आहे. आई-वडिलां नाच मी देव मानतो त्यामुळेच मी आज भक्कमपणे उभा आहे. साहजिकच समाजासाठी जे जे करता येईल ते ते मी नित्यनेमाने करीत आहे,” अशा भावना महेंद्र घरत यांनी वडिलांच्या दहाव्या स्मृतिदिनी व्यक्त केल्या.
यावेळी बुवा गणेश गोंधळी, पखवाज वादक विशाल मोरे, तबलावादक धनंजय खुटले, धर्मा पाटील, तसेच कोरस यांनी सुश्राव्य भजन सादर केले.
यावेळी दिबांचे पुत्र अतुल पाटील, परेशशेठ ठाकूर,सुनील म्हसकर, अतुल म्हात्रे, श्रुती म्हात्रे, जेडब्लूआरचे मालक जोबनपुत्र साहेब, संदीप मुंडे, राम म्हात्रे, गुलाबशेठ घरत, श्रीकांत घरत भाऊशेठ पाटील, वसंत म्हात्रे, वसंतशेठ पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अनिल घरत, रमेश घरत, अनंता घरत पी. के. रामण, वैभव पाटील, किरीट पाटील, वैभव ठाकूर, संदेश ठाकूर, रोहित घरत नाना गडकरी, तसेच घरत परिवारातील नातेवाईक व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.