अलिबाग दि.०७: प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून तसेच जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.
भारतीय हवामान खात्याने दि.०१/०७/२०२६ रोजी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि.१/०७/२०२६ ते ५/०७/२०२६ या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा (Heavy to very heavy rainfall at a few places with extremely heavy rainfall at isolated places) इशारा दिलेला आहे.
किशन ना. जावळे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड यांनी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील दि.०२/०८/२०१९ रोजीच्या परिपत्रकान्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, पोलादपूर या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शाळांना दि. ०२/०७/२०२६ रोजी सुट्टी जाहिर केली आहे, तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर तहसिलदार यांनी या भागात दि.१/०७/२०२६ रोजी संततधार पाऊस सुरु असल्याने तसेच हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीची शक्यता विचारात घेवून या तालुक्यातील शाळांना दि.२/०७/२०२६ रोजी सुट्टी देण्याची विनंती केली आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार केला असता अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना दि.०२/०७/२०२६ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!