पनवेल, दि.15 (संजय कदम) पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेथ एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेवून हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळताच क्युआरटी पथकाने सदर ठिकाणी जावून अत्यंत शिताफीने एका इसमास ठार मारुन तर त्याच्या सहकार्‍यास जीवंत पकडून ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पनवेलकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असला तरी सदर घटना ही पोलिसांचेच मॉक ड्रिल असल्याचे निष्पन्न झाले.
शहरातील बेथ एन प्रार्थनालय हे अत्यंत महत्वाचे ठिकाण असून या ठिकाणी मॉक ड्रिल करण्याच्या उद्देशाने विशेष ऑपरेशन क्युआरटीच्या माध्यातून राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, वाहतूक शाखेचे वपोनि संजय पाटील, पोलीस निरीक्षक भगत यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे अग्नीशमन दल, रुग्णवाहिका इतर अत्यावश्यक सेवा, 7 पोलीस अधिकारी व 57 कर्मचारी यात सहभागी झाले होते. या ऑपरेशन दरम्यान सदर ठिकाणी घुसलेल्या दोन शस्त्रधारी इसमांपैकी एकाला ठार मारण्यात आले तर एकास जीवंत पकडण्यात आले. त्याची बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली व त्याच्याकडील शस्त्र व दारुगोळा ताब्यात घेण्यात आला. आतमध्ये कोणालाही जखमा झाल्या नाहीत, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांकडून देण्यात आली व सदर ऑपरेशन हे यशस्वी झाल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!