स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना अनेक राष्ट्रीय कार्यक्रमापैकी “रक्तदान चळवळ” समाजात रुजविण्यात महाराष्ट्र शासन , केंद्रशासन, विविध सामाजिक संस्था इ. माध्यमातून यशस्वी होत आहे.

मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्याने रक्तदानाची प्रेरणा समाजात दृढ करणे, सुदृढ रक्तदात्यांची फौज उभी करणे, वाढदिवसाला किंवा तीन महिन्यांनी रक्तदान करणे , रक्तदानाची प्रेरणा रक्तदात्यांमध्ये  दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी रक्तदान यज्ञात स्वैच्छिक रक्तदाता म्हणून सहभागी व्हावे. आपण समाजाचे जबाबदार घटक या नात्याने समाजात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी,या मागचा एवढाच उद्देश.

जागतिक आरोग्य संघटना , रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीज , इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन्स (IFBDO) आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन (ISBT) यांनी “सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वैच्छिक रक्तदानाबद्दल रक्तदात्यांचे जीवन वाचविणाऱ्या उदात्त कृत्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी “१४ जून जागतिक रक्तदाता दिन” म्हणून साजरा केला जातो. सन-२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेव्दारे आयोजित करण्यात आला होता.
५८ व्या जागतिक आरोग्य संमेलनात सन-२००५ मध्ये रक्तदानाच्या महत्त्वाविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा वार्षिक जागतिक कार्यक्रम म्हणून घोषित करण्यात आला.
या वर्षीचे शासनाचे घोषवाक्ये आहे ….
“२० years of celebrating giving: Thank you, blood donors !”

१४ जून जागतिक रक्तदाता दिनाचे महत्त्व:-

ए,बी,ओ रक्तगटाचे जनक कार्ल लँडस्टेनर (आँस्ट्रेलिया, व्हिएन्ना शहर) यांचा १४ जून १८६८ हा जन्मदिवस “Save Blood ,Save Life”या संकल्पनेतून साजरा करण्यात येतो. या संशोधनासाठी सन 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मानवाचे प्राण वाचवण्यासाठी ज्या रक्तदात्यांनी आपले स्वैच्छिक रक्तदान करुन रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस…..

“रक्तदाता” अनेक वर्षांपासून ज्या रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून आयोजित रक्तदान शिबिरात, स्वयंस्फूर्तीने जवळच्या शासन मान्यता प्राप्त रक्तकेंद्रात गरजू रुग्णांसाठी रक्तदान (२५,५०,१०० किंवा त्यापेक्षा जास्त वेळा )केलेल्या रक्तदात्यांप्रति आभार व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे १४ जून जागतिक रक्तदाता दिन.

रक्तदात्यांचे अमुल्य रक्तदान:-

थँलेसेमिया,हिमोफिलिया,प्रसूती,अपघात,रक्तक्षय, कर्करोग,अति
रक्तस्राव इ.रुग्णांसाठी रक्त हे “लाईफ लाईन” आहे, अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज असते. अशा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी माझे रक्तदान अमूल्य आहे.

बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.

रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता काटेकोरपणे पाळले जाते. त्यामुळे कोणतीही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते.

मानवी रक्ताला पर्याय नाही कारण “रक्त” हे कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत तसेच कारखान्यात तयार करता येत नाही तसेच जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे माणसाचा जीव वाचविण्यासाठी माणसाचेच रक्त द्यावे लागते.

“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान”आहे, दान केलेले रक्त नैसर्गिकरित्या भरून निघते.

रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदाता म्हणून आपले स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे…

आपल्या स्वैच्छिक रक्तदानाने एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.यासाठी माझे स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे.

रक्तदान प्रक्रिया सुरक्षित,आनंददायी तसेच नवचेतना निर्माण करणारे असते. .

समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून नि:स्वार्थपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवेच्या भावनेतून आपले रक्तदान महत्त्वाचे.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून रक्त घेतले जाते.

 आपले रक्तदान "रक्तदाता" म्हणून अमुल्य असून आपल्या रक्तदानाने नक्कीच आपण रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. रक्तदानाच्या या महान कार्यात आपण "रक्तदाता" म्हणून सहभागी होऊन भारतीय नागरिक म्हणून देशाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात मोलाचे योगदान देऊ शकता. 

रक्तदाते आणि रक्तदान शिबिर आयोजक यांचे रायगड जिल्ह्यात रक्तदान जनजागृतीपर फार महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होत आहे.
“रक्तदान” हे एकतेचे महान कार्य आहे. या प्रयत्नात सामील व्हा आणि जीव वाचवा.”

   हेमकांत सोनार
   रक्तपेढी तंत्रज्ञ,
  अलिबाग-रायगड.
   ९५११८८२५७८.
श्रीराम सचिंद्र जोशी – रक्तदाता

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!