पनवेल दि.३: पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. यांच्या वतीने हे रुग्णालय दत्तक घेतल्याचे महापाालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अर्थात सेवा पंधरवड्यानिमित्त स्वच्छता ही सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि. यांच्या वतीने रविवारी पनवेल शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या शुभारंभ कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक राजू सोनी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यतिन देशमुख, डॉ. मधुकर पांचाळ, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ उपेंद्र मराठे, डॉ. अरुणा पोहरे व रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना परेश ठाकूर यांनी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांची सेवा चांगली असूनही स्वच्छतेबद्दल नातेवाईक नाखुष असतात. त्यामुळे आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील स्वच्छता करण्यासाठी एक वर्ष कर्मचारी नेमण्याचे ठरवले असले तरी वेळ पडली, तर जास्त काळ आम्ही ही सेवा पूरवू असे जाहीर केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133