नवी मुंबई दि.१७: सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्ग क्र. 1 वर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रोच्या फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू होणार असून सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
सर्वाधिक गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव मेट्रो फेऱ्यांचा लाभ व्हावा याकरिता सदर मार्गावर 20 जानेवारी 2025 पासून मेट्रो फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बेलापूर आणि पेंधर स्थानकांतून सकाळी 06.00 वाजेपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे. बेलापूर येथून रात्री 22.00 वाजता व पेंधर येथून रात्री 21.45 वाजता मेट्रोची शेवटची फेरी धावणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी 07.30 ते 10.00 आणि सायंकाळी 05.30 ते 08.00 तर पेंधर येथून सकाळी 07.00 ते 09.30 आणि सायंकाळी 05.00 ते 07.30 दरम्यान दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी होणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेंधर येथून दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!