पनवेल : ७ जून – ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त पनवेल मधील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी रक्तदान शिबिराबरोबरच आरोग्य, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. दारुल अमन ट्रस्ट च्या पुढाकाराने व रोटरी ब्लड बँक, क्रिटीकेअर लाईफलाइन हॉस्पिटल पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. नवीन पनवेल येथील दारूल अमन ट्रस्ट च्या मस्जिदीच्या आवारात हे शिबिर पार पडले.
धर्माने सांगितलेल्या “त्याग” या मूल्यास अनुसरून सर्व धर्मियांनी एकत्र येऊन मानवतेचा संदेश देणारा हा रक्तदान उपक्रम गेली ७ वर्षे विविध सामाजिक संघटनांमार्फत राबविला जात आहे. यावर्षी शंभरहून अधिक जणांनी याचा लाभ घेतला. २३ जणांनी रक्तदान केले.
यावेळी दारूल अमन ट्रस्टचे ए. एम. इनामदार, अल्लाउद्दीन शेख, असिफ कुरेशी, आरती नाईक, बगाडे काका, प्रवीण जठार, बाबासाहेब चिमणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
एक थेंब तुमचं रक्त, कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं! धर्म, जाती, वर्गापलीकडे जाऊन एकत्र येऊया – मानवतेसाठी रक्तदान करूया! हा संदेश देत महा. अंनिस शाखा पनवेल, महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम पनवेल, ए. एफ. टी. ट्रस्ट पनवेल, मक्तब ए नुरुल उलूम, आई समाजकल्याण संस्था वावंजे, संविधान प्रचारक, सर्वोदय, ग्रामस्वराज्य समिती महाराष्ट्र, कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थानी हा उपक्रम राबविला.

🛑कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ पनवेलतर्फे रक्तदान शिबिर संपन्न !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!