पनवेल दि.७ : कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने आणि ओरायन मॉलच्या सहकार्याने आज पनवेल शहरातील ओरायन मॉल येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १६० रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. रक्तदाना साठी २१० जणांनी रजिस्ट्रेशन केले त्या पैकी १६० जण रक्तदान करण्यास पात्र ठरले.
या शिबिराचे उदघाटन पनवेल सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले. याशिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाचे अध्यक्ष मंगेश परुळेकर यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी उपाध्यक्षा नंदा विभाकर नाईक, शिवदास कांबळे, गंगाराम सामंत, यतीन ठाकूर, शाम वालावलकर, विनायक तिरोडकर, हरेष परुळेकर, चंद्रकांत तेंडोलकर, लक्ष्मण अवसरे, आकांक्षा अवसरे, माधुरी प्रभू, निशा वालावलकर, गीता प्रभू, नयन पाटकर, भारती खानोलकर, चेतना वालावलकर, मैंथिली सामंत, अपूर्वा प्रभू, अभय प्रभू, चिन्मय नाईक, पूर्णिमा तिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून, गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता वाढण्यास मदत झाली आहे. या शिबिराच्या आयोजनात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मंडळाने आभार मानले.

🛑बकरी ईद निमित्त वैद्यकीय शिबिराचे आयोजन🔸विविध सामाजिक संस्था आणि हॉस्पिटलचा सहभाग

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!