अलिबाग,दि. 31: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 51 हजार 115 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 135 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-78, पनवेल ग्रामीण-17, उरण-5, खालापूर-7, कर्जत-1, पेण-7, अलिबाग-2, माणगाव-3, रोहा-5, सुधागड-2, श्रीवर्धन-2, महाड-6 असे एकूण 135 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 2 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-696, पनवेल ग्रामीण-305, उरण-56, खालापूर-68, कर्जत-11, पेण-60, अलिबाग-51, मुरुड-3, माणगाव-21, तळा-1, रोहा-34, सुधागड-4, श्रीवर्धन-4, म्हसळा-1, महाड-13, पोलादपूर-4 अशी एकूण 1 हजार 332 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-22 हजार 285, पनवेल ग्रामीण-6 हजार 505, उरण-1 हजार 905, खालापूर-2 हजार 485, कर्जत- 1 हजार 648, पेण-3 हजार 705, अलिबाग-4 हजार 684, मुरुड-412, माणगाव- 1 हजार 864, तळा-161, रोहा-2 हजार 298, सुधागड-386, श्रीवर्धन-382, म्हसळा-308, महाड- 1 हजार 682, पोलादपूर-405 अशी एकूण 51 हजार 115 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-108, पनवेल ग्रामीण-17, खालापूर-6, पेण-9, अलिबाग-11, मुरुड-2, माणगाव-4, रोहा-4, सुधागड-1, म्हसळा-1, महाड-1 असे एकूण 164 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-552, पनवेल ग्रामीण-131, उरण-109, खालापूर-117, कर्जत-97, पेण-100, अलिबाग-137, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-86, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 552 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 2 लाख 02 हजार 409 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 130 आहे.