अलिबाग,दि. 01: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 51 हजार 239 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 123 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-83, पनवेल ग्रामीण-17,  खालापूर-2, कर्जत-2, पेण-7, अलिबाग-6, माणगाव-1, रोहा-2,  श्रीवर्धन-1, महाड-2, असे एकूण 123 ने वाढ झाली आहे.

           आजच्या दिवसात 2 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-1, अलिबाग-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-696, पनवेल ग्रामीण-298, उरण-56, खालापूर-63, कर्जत-13, पेण-65, अलिबाग-49, मुरुड-2, माणगाव-22, तळा-1,  रोहा-36, सुधागड-4, श्रीवर्धन-5, म्हसळा-1, महाड-14, पोलादपूर-4 अशी एकूण 1 हजार 329 झाली आहे.

          कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-22 हजार 367, पनवेल ग्रामीण-6 हजार 529, उरण-1 हजार 905, खालापूर-2 हजार 492, कर्जत- 1 हजार 648, पेण-3 हजार 707, अलिबाग-4 हजार 691, मुरुड-413, माणगाव- 1 हजार 864, तळा-161, रोहा-2 हजार 298, सुधागड-386, श्रीवर्धन-382, म्हसळा-308, महाड- 1 हजार 683, पोलादपूर-405 अशी एकूण 51 हजार 239 आहे.  

             आज दिवसभरातही पनवेल मनपा-82, पनवेल ग्रामीण-24,  खालापूर-7, पेण-2, अलिबाग-7, मुरुड-1,  महाड-1 असे  एकूण 124 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

  आतापर्यंत पनवेल मनपा-553, पनवेल ग्रामीण-131, उरण-109, खालापूर-117, कर्जत-97, पेण-100, अलिबाग-138, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-86, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 554 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.       

          आतापर्यंत जिल्ह्यातून 2 लाख 03 हजार 039 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 130 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!