पनवेल दि.३०: पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर करण्याबाबातचा निर्णय हा महासभेत चर्चा केल्याशिवाय होऊ शकत नाही. आयुक्त एकतर्फी असा निर्णय घेऊ शकत नसल्याने कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नसल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट करत कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होऊ देणार नाही, असे आश्वासित करून कोळी बंधू भगिनींच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहत त्यांना फार मोठा दिलासा दिला.
पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार असल्याची बातमी आयुक्तांचा हवाला देऊन एका वर्तमान पत्रात प्रसिध्द झाल्याने पनवेल मधील कोळी बांधवात खळबळ उडाली. पनवेल कोळी वाड्यातील ९९ टक्के कुटुंबांचा मुख्य व्यवसाय मासळी विक्री असल्याने हा बाजार स्थलांतरित झाल्यास त्यांच्या अर्थकारणावर परिणाम होणार असल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सकाळी उरण नाक्यावरील मासळी बाजारला भेट देऊन तेथील कोळी बांधवांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी पनवेल शहरात असलेला मासळी बाजार हलवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करून असा कोणताही निर्णय सत्ताधारी भाजप आणि आरपीआय पक्षाने घेतलेला नाही. त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून अशी चर्चा करताना येथील कोळी समाजाला आणि पंच कमिटीला विश्वासात घेतल्याशिवाय चर्चा केली जाणार नाही. विरोधकांनी काम नसल्याने ही अफवा पसरवली आहे. आयुक्त अशा प्रकारचा निर्णय एक तर्फी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कोळी बांधवांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा धीर देत कोळी बंधू भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे अधोरेखित केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!