ठाणे दि.29: येत्या शनिवारी ३१ आॅक्टोबर रोजी ‘ब्ल्यू मून‘ योग येत आहे. एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून‘ असे म्हटले जाते. परंतू या दिवशी चंद्र प्रत्यक्षात निळा दिसत नाही त्यामुळे खगोलशास्त्रीय दृष्ट्या ब्ल्यू मून योगाला तसे विशेष महत्त्व देण्यात येत नाही असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देतांना दा. कृ. सोमण म्हणाले की आॅक्टोबरमध्ये १ तारखेला अधिक आश्विन पौर्णिमा होती आणि ३१ आॅक्टोबर रोजी निज आश्विन पौर्णिमा येत आहे.
एखादी दुर्मिळ घटना असली तर आपण ‘वन्स इन ए ब्ल्यू मून‘ म्हणतो. वस्तुत: एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येणे हा काही तसा दुर्मिळ योग नाही. यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी ‘ब्ल्यू मून‘ योग आला होता. आता यानंतर ३१ आॅगस्ट २०२३ रोजी तसाच ‘ब्ल्यू मून‘ योग येणार आहे.
शुक्रवार, ३० आॅक्टोबर रोजी सायं. ५ वाजून ४५ मिनिटांनी आश्विन पौर्णिमा सुरू होईल. त्या दिवशी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री कोजागरी पौर्णिमा साजरी करावयाची आहे. त्यामुळे यावेळच्या कोजागरीचा चंद्र हा ‘ब्ल्यू मून‘ असणार आहे. शनिवार ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजून १८ मिनिटांनी आश्विन पौर्णिमा समाप्त होत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!