अलिबाग,दि. 28: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 50 हजार 572 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 148 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-83, पनवेल ग्रामीण-34, उरण-5, खालापूर-7, कर्जत-2, पेण-5, अलिबाग-8, माणगाव-1, सुधागड-1, महाड-1, पोलादपूर-1 असे एकूण 148 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 4 व्यक्तींची (पनवेल (मनपा) -4) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-798, पनवेल ग्रामीण-327, उरण-50, खालापूर-61, कर्जत-11, पेण-64, अलिबाग-70, मुरुड-9, माणगाव-24, रोहा-40, सुधागड-3, श्रीवर्धन-1, म्हसळा-5, महाड-12, पोलादपूर-3 अशी एकूण 1 हजार 478 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-21 हजार 937, पनवेल ग्रामीण-6 हजार 417, उरण-1 हजार 903, खालापूर-2 हजार 471, कर्जत- 1 हजार 646, पेण-3 हजार 682, अलिबाग-4 हजार 655, मुरुड-406, माणगाव- 1 हजार 856, तळा-161, रोहा-2 हजार 287, सुधागड-385, श्रीवर्धन-382, म्हसळा-304, महाड- 1 हजार 675, पोलादपूर-405 अशी एकूण 50 हजार 572 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-156, पनवेल ग्रामीण-16, उरण-9, खालापूर-4, पेण-3, अलिबाग-14, मुरुड-1, माणगाव-4, रोहा-8, महाड-6, असे एकूण 221 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-544, पनवेल ग्रामीण-130, उरण-109, खालापूर-117, कर्जत-95, पेण-99, अलिबाग-137, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-83, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 537 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 99 हजार 301 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 134 आहे.