अलिबाग, दि.5 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 25 हजार 245 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 769 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-230, पनवेल ग्रामीण-104, उरण-14, खालापूर-25, कर्जत-34, पेण-53, अलिबाग-109, माणगाव-42, रोहा-30, सुधागाड-15, श्रीवर्धन-5, महाड-90, पोलादपूर-18 असे एकूण 769 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 14 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-8, खालापूर-1, कर्जत-1, पेण-1, माणगाव-2, रोहा-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 552, पनवेल ग्रामीण-553, उरण-207, खालापूर-225, कर्जत-185, पेण-362, अलिबाग-579, मुरुड-29, माणगाव-262, तळा-27, रोहा-278, सुधागड-99, श्रीवर्धन-24, म्हसळा-7, महाड-241, पोलादपूर-48 अशी एकूण 4 हजार 678 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-11 हजार 064, पनवेल ग्रामीण-3 हजार 259, उरण-1 हजार 189, खालापूर-1 हजार 539, कर्जत-761, पेण-1 हजार 921, अलिबाग-1 हजार 861, मुरुड-199, माणगाव-716, तळा-43, रोहा-1 हजार 118, सुधागड-148, श्रीवर्धन-211, म्हसळा-220, महाड-840, पोलादपूर-156 अशी एकूण 25 हजार 245 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-165, पनवेल ग्रामीण-85, उरण-17, खालापूर-48, कर्जत-5, पेण-9, अलिबाग-55, मुरुड-4, माणगाव-25, रोहा-17, सुधागड-7, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-7, पोलादपूर-2 असे एकूण 451 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-312, पनवेल ग्रामीण-75, उरण-70, खालापूर-75, कर्जत-44, पेण-66, अलिबाग-64, मुरुड-19, माणगाव-20, तळा-3, रोहा-37, सुधागाड-14, श्रीवर्धन-17, म्हसळा-9, महाड-46, पोलादपूर-13 असे एकूण 884 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 7 हजार 615 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 196 आहे.