पनवेल दि.६: पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक १९ ‘ब’मधील भाजप, रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी भव्य विजय संकल्प बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर आदी प्रमुख नेत्यांसह आजी-माजी नगरसेवक, कायर्र्कर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘भाजप-रिपाइं युतीचा विजय असो’, ‘रूचिता लोंढे आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. मतदारांनी या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले.