नवा CM होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री
मुंबई दि.२६: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. नव्या सरकारचा शपथविधी होई पर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर राहतील.