पनवेल दि.२५: तळोजा एमआयडीसी येथील केम्सपॅक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगारांनी कंपनीच्या गेट समोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. थकीत वेतन मिळावे आणि नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी स्थानिक कंत्राटी कामगारांनी केली आहे. या बाबत 104 कंत्राटी कामगारांनी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांची भेट घेतली, कामगारांचे म्हणणे ऐकुन घेत स्थानिक कामगारांवर अन्याय होऊ नये बेरोजगार होऊ नये यामुळे केम्सपॅक केमिकल्सच्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी प्रशासनाला केली आहे. कामगारांना नोकरीत सामावून घेत नाहीत तोपर्यंत लढा दिला जाईल असे सोनावणे यांनी यावेळी सांगितले
केम्सपॅक या कंपनीत १०४ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. कंपनीला आग लागल्यानंतर काही महिने कंपनी व्यवस्थापनाने बंद केली होती, पुन्हा नव्याने कंपनी सुरू करण्यात आली मात्र त्यांतील काही कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात आले. तर काहींना त्यांचे वेतन थेट खात्यात जमा करून कोणतीही पूर्वसूचना न देता घरी बसवण्यात आले त्यानंतर कंपनीने कंत्राटदाराला बदलून कंपनीने नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली. त्यामुळे येथील स्थानिक पडघे, कोलवाडी वावंजे आदी गावातील स्थानिक कामगार कामापासून वंचित ठेवले. सध्या कामगारांची आवश्यकता असुन देखील कंपनीत नाक्यावरील परप्रांतीय कामगार आणून काम केले जाते मात्रं स्थानिक कामगारांना कामावर घेण्यास कंपनी व्यवस्थापनाने कानाडोळा केल्याचे चित्र
असल्याचे या कामगारांनी सांगितले. यासंदर्भात डिसेंबर २०२४ मध्ये कामगार उपायुक्त, पनवेल यांच्याकडे झालेल्या सुनावणीत कंपनी टप्प्याटप्प्याने कामगारांना नोकरीमध्ये सामावून घेईल, असे सांगितले होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे या कामगारांनी आमरण उपोषण केले ते देखील प्रशासनाच्या मदतीने चिरडण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे, स्थानिक पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत कंपनी स्थानिक कामगारांवर अन्याय करीत आहे थकीत वेतन मिळावे, तसेच पुन्हा नोकरीवर सामावून घ्यावे या मागण्यांसाठी सुरु केलेले हे आंदोलन न्याय मिळेपर्यंत कामगारांन सोबत सनदशीर मार्गाने लढा देउ असे फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले .

🛑Panvel City Police: पोलिसांची जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम !
🛑कळंबोलीतल्या भिंती करतायत समाज प्रबोधनाचे कार्य !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!