कळंबोली दि.२५ (दीपक घोसाळकर) : भिंतींना कान असतात ही म्हणून सर्वश्रुत आहे. पण भिंती आता बोलूही लागतात अन समाजप्रबोधनाचे कामही करू लागतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. कळंबोली वसाहती मधील फुटपाथला लागून असलेल्या भिंतीवर आकर्षक, समाज प्रबोधन करणाऱ्या रंगीबेरंगी शब्दांची भुरळ कळंबोली वासियांना पडली आहे. समाज व्यवस्थेबाबत जळजळीत अन शिकाऊ अंजन घालणाऱ्या या भिंती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. महापालिकेच्या वतीने विविध स्लोगन, म्हणी व समाज प्रबोधन घडवणाऱ्या सुंदर अद्याक्षरांनी कळंबोलीतल्या भिंती आता बोलू लागल्या आहेत. समाजप्रबोधनाच्या कार्यात त्यात झोकून देत आहेत. या उपक्रमाला कळंबोलीतील नागरिकांनी हे भरपूर प्रतिसाद देऊन महापालिकेच्या या विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
महापालिकेच्या वतीने स्वच्छ कळंबोली सुंदर कळंबोली चा नारा देत कळंबोलीतील पोस्ट कार्यालय ते सुधागड विद्या मंदिराजवळच्या रस्त्याच्या दुतर्फा पदपथाच्या बाजूला असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या भिंतींना चांगले दिवस व त्यांचे रूपच पालटून जात आहे. केंद्र शासनाच्या व महापालिकेच्या स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत कळंबोलीतील पदपथाला लागून असलेल्या भिंतींची रंगरंगोटी करून त्यावर विविध प्रकारच्या समाज प्रबोधन करणाऱ्या अद्याक्षरे, विविध चित्रांनी भिंती रंगीबिरंगी झाल्याने भहरल्या आहेत. या भिंतीवर पाणी वाचवा देश वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता असेल जिथे आरोग्य वसेल तिथे, मंत्र सुखाचा एक खरा जलसाक्षरतेची कास धरा, साक्षरतेचा एकच मंत्र शिक्षण देणे हे एकच तंत्र, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करू घर अंगण परिसर स्वच्छ करू,तंबाखूमुक्त समाज, सहित विविध प्रकारच्या समाज प्रबोधन व समाज हीच जपणाऱ्या अद्याक्षरे व वाक्यांनी कळंबोलीतील भिंतीं ही समाजकार्याचा वसा घेत उभ्या आहेत. महापालिकेच्या वतीने या नवीन उपक्रमाचे कळंबोलीतील नागरिकांनी ही स्वागत करून महापालिकेला धन्यवाद दिले आहेत. भिंतींवर सुबक व दर्जेदार लिखाणाने कळंबोलीचाच चेहरा मोहरा आता पालटून जात आहे. एकीकडे स्वच्छतेचा घेतलेला वसा आणि त्या स्वच्छतेलाच दर्जेदार अशा रंगीबेरंगी सुबक कलाकृती या भिंतीवर रेखाटल्याने कळंबोलीचेच रुपडे आता पालटू लागले आहे. या महापालिकेच्या उपक्रमातून कायमस्वरूपी प्लास्टिकचे बॅनर लावण्याऐवजी भिंतीवर कलात्मक दर्जेदार हस्ताक्षराने काम करण्याची किमया महेंद्र पेंडूरकर हा दर्जेदार कलाकार आपली कला या भिंतीवर रेखाटत आहे. नेटवरूनच विविध प्रकारचे समाज प्रबोधन करणाऱ्या वाक्यांची तो माहिती घेऊन समाज मन आणि समाज प्रबोधन करणाऱ्या अक्षरे भिंतीवर चांगल्या प्रकारे रेखाटून आपल्याही कलेचा दर्जा हा कलाकार दाखवून देत आहे. एक प्रकारे या कलाकारांच्या हातालाही या महापालिकेच्या स्तुत्य उपक्रमाने कामही मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अन स्वच्छता मिशन या उपक्रमांतर्गत महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनानुसार कळंबोलीतील काही परिसरातील पदपथाच्या बाजूच्या भिंतीवर सुबक आकर्षक कलाकृती रेखाटून त्या माध्यमातून जनजागृती करिता महापालिकेचा एक अभिनव उपक्रम आहे. यातून निश्चितच समाज प्रबोधना सोबत समाजहित जपण्याचेही काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. – डॉ. वैभव विधाते, उपायुक्त पनवेल महापालिका

🛑’केम्सपॅक केमिकल्स मधील कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्या’ – जागृती फाऊंडेशन चि मागणी !
🛑Panvel City Police: पोलिसांची जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!