पनवेल दि.२०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त आणि शताब्दी वर्षाच्या पदार्पणानिमित्त विजयादशमी सोहळा व भव्य पथसंचलन देशभरासह मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये मोठ्या उत्साहात आयोजित केले जाते. विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वात मुख्य उत्सव मानला जातो, कारण याच दिवशी १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे संघाची स्थापना केली होती.
मुंबई आणि पनवेलमधील विविध उपनगरांमध्ये हजारो स्वयंसेवक पूर्ण गणवेशात एकत्र येतात. संघाच्या पारंपरिक घोष पथकाच्या तालावर आणि ड्रमच्या ठेक्यावर स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कदमताल करत मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करतात.
विजयादशमी/ दसरा सणाच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पनवेल नगर यांच्यावतीने पनवेल नगर सहकार्यवाहक कुणाल मानकामे यांच्या नेतृत्वाखाली आज पथसंचालनाचे आयोजन केले होते. सदर पथसंचलन गणेश मंदिर साईनगर येथे सुरू होऊन साज बंगला सुशील गार्डन- किनारा सोसायटी – रचना लक्ष्मी बिल्डिंग ते साईनगर मैदान येथे समाप्त झाले. पथकसंचलनामध्ये पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, इतर पदाधिकारी तसेच शेकडोंच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. पथसंचलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133