ठाणे दि.६: मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि पितांबरी यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वास्थसंवाद – आयुर्वेद: काल, आज, आणि ऊद्या” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी 10 ते दुपारी १.30 वाजेपर्यंत सहयोग मंदिर, पहिला मजला, उत्कर्ष मंडळ सभागृह, ठाणे पश्चिम येथे होणार असून
आयुर्वेदाची परंपरा, त्याविषयीचे समज गैरसमज आणि आधुनिक जीवनशैलीतील त्याचे महत्त्व याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात वैद्य विनय वेलणकर, वैद्य उर्मिला पिटकर, वैद्य गौरांगी करमरकर आणि वैद्य मानसी धामणकर सहभागी होणार असून, “आयुर्वेद : समज, गैरसमज आणि वास्तव – काल, आज आणि उद्या” तसेच “दिनचर्या, आहार आणि मधुमेह” या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
यानंतर वैद्य मेधा मेहेंदळे यांच्या संचालनाखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात वरील सर्व वैद्य सहभागी होऊन आयुर्वेद, आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित विविध प्रश्नांवर संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून. नोंदणी सकाळी ९:३० वाजेपासुन सुरू होणार असून सर्वांनी १० मिनिटे आसनस्थ व्हावे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आरोग्यविषयक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि पितांबरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
