माथेरान दि.११: (मुकुंद रांजाणे) माथेरान मधील मूलभूत आणि पायाभूत सुविधा मार्गी लागण्यासाठी खूपच वेळ लागत असून आजपर्यंत स्थानिकांना आपल्या न्याय हक्कासाठी शासकीय दरबारात खेटे मारून सुध्दा काहीही साध्य होत नाही. त्यामुळेच या गावाला खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात आणि राज्यात सरकार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्षम नेत्यांशिवाय पर्याय उरलेला नाही ही बाब हळूहळू येथील स्थानिकांच्या लक्षात यायला लागल्याने ई रिक्षांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एकूण ७४ पैकी १५ हातरीक्षा चालकांनी आज माथेरान शहरातील तीन माजी नगरसेवक दिनेश सुतार,संतोष लखन, संतोष शिंदे व बहुप्रतीक्षित असलेल्या एकूण १५ ई-रिक्षा चालकांनी पनवेल विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन पनवेल येथील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अद्यापही माथेरान मधील अनेकजण भाजपाचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. यावेळी माथेरानमधील प्रलंबित प्रश्न व ई-रिक्षा चालकांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी माथेरान शहराध्यक्ष प्रविण सकपाळ, आकाश चौधरी, राजेश चौधरी, संतोष शेलार, प्रदीप घावरे,चंद्रकांत जाधव, किरण चौधरी, सौरभ घावरे,शंतनू जमदाडे, चैतन्य शिंदे उपस्थित होते.
हा फक्त पक्षप्रवेश नसून आगामी काळात इथल्या राजकारणाला कलाटणी देणारा असून अद्यापही खूपच राजकीय घडामोडी नागरिकांना पहावयास मिळणार आहेत असे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बोलत आहेत.
![]()
