पनवेल दि.२१: पनवेल येथील गेली अनेक वर्षे पत्रकारिते मद्धे लेखणीच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना न्याय देण्या बरोबरच विविध सामाजिक विषय मार्गी लावणारे पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांना नागोठने ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा मानाचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून खासदार लोकनेते सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नागोठने येथे नागोठने ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा १४ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खासदार लोकनेते सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच बरोबर नागोठने ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचे अध्यक्ष अँड.महेश पवार, संस्थापक श्यामकांत नेरपगार, सचिव अनिल पवार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार प्रशांत शेडगे गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रिय असून त्यांनी आता पर्यंत अनेक नामांकित वृतपत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. या मुळे पत्रकार शेडगे यांना पनवेल गौरव पुरस्कार,पनवेल भूषण पुरस्कार,महाराष्ट्र एक्सेलन्स अवार्ड बरोबरच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात आणखीन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याने समाजातील सर्व स्थरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!