पनवेल दि.1: राज्यासह पालिका क्षेत्रात कोराना रूग्ण संख्या वाढू लागल्याने शासनाने पुन्हा कठोर निर्बंध लागू गेले आहेत. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबरोबरच विना मास्क फिरणाऱ्या आणि रात्री 9 नंतर जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाबरोबर आयुक्त गणेश देशमुख यांनी स्वत: रस्त्यांवर उतरले होते. त्यांच्याबरोबर उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवेही होत्या. महापालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे,पनवेल, अशा चारही प्रभागात आयुक्तांनी स्वतः जाऊन दंडात्मक कारवाई केली.
यावेळी ठरवून दिलेल्या आसनक्षमते पेक्षा जास्त गर्दी असलेल्या आस्थापना,तसेच ठरवून दिलेल्या वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर पालिकेच्या भरारी पथकाच्यावतीने कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या आणि मास्क वापर करीत नसलेल्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!