नवी मुंबई दि.13: कोरोनाच्या या लॉकडॉउन काळामध्ये आपणा सर्वांना आपल्या अंतर्मनात डोकावण्याची संधी मिळाली. काही अपवादात्मक व्यक्ती सोडलेत तर इतरांनी आपल्या धरती मातेची काहीही काळजी केलेली नाही, परिणामी निसर्ग अती वेगाने विनाशाकडे जात आहे. या लॉकडाउन काळामध्ये आपल्याला निसर्गात बराच सकारात्मक बदल बघावयास मिळाला व सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. अश्यावेळी या परिस्थितीचा लाभ घेत गायक वीराग मधुमालती, ज्यांनी संगीत क्षेत्रात विविध सामाजिक जनजागृती साठी आजवर ५वेळा जागतिक विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदविले आहेत, यांनी एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेची सुरुवात केली. त्यांनी स्वतः गेल्या वर्षापासून प्लास्टिक डिस्पोजेबल बॉटल मध्ये आजन्म पाणी न पिण्याचा व इतर काही संकल्प केले आहेत. आता संपूर्ण विश्वातील गायक कलाकारांना एकत्रित करून धरती मातेच्या रक्षणासाठी ‘मिशन सेव्ह मदर अर्थ’ चा प्रचार व प्रसार करण्यासाठी यू टयूब वर सलग १२ तास गीत गायन करून इतरांना देखील पर्यावरण संवक्षणासाठी संकल्प घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मालिका आखली आहे. या अंतर्गत पार्ट १ व पार्ट २ यशस्वी रित्या पार पाडला असून येत्या १५ ऑगस्ट ला पार्ट ३ कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमात समर्थ दरदेकर, रसिका शेजुल, चंद्रशेखर शुक्ला, वेणुगोपाल अय्यर, स्वाती खोसला, प्रेम धमेजा, शारदा गोटेफोडे, रोहन गोखले, राखी पाटील, चंदा भाकरे, दीपक श्रीवास्तव, चांद माथूर, राहुल सोनावणे, अविनाश सावंत, जयांथी सुरेश, शुभांगी बडवे या गायक कलाकारांनी देखील पर्यावरण रक्षणासाठी वेगवेगळे संकल्प केले असून आपले अमूल्य योगदान दिले आहे.
तरी सर्व गायक कलाकारांचे आभार व्यक्त करीत वीराग मधुमालती यांनी जास्तीत जास्त लोकांनी स्वेच्छेने निसर्गासाठी व आपल्या भावी पिढी साठी आजन्म काहीतरी संकल्प करावा असे आवाहन केले आहे.
या मिशन मदर अर्थ कार्यक्रमात गायकांना सहभाग घ्यायचा असल्यास वंदना वानखेडे यांच्याशी(९८६७८७५७८७) या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
