महाड दि.24 (चंद्रकांत कोकणे) आज सायंकाळी महाडला हादरविणारी घटना घडली आहे. शहरांतील काजळपूरा येथील पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. जखमींना काढण्यासाठी एनडीआर‌एफ ला पाचारण करण्यात आले आहे.
              आॅगस्ट महिना महाड साठी पुन्हा एकदा घातक महिना ठरला आहे. आज सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास महाड मुंबई मार्गावरील काजळपूरा येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत पिलर फुटल्याने पत्त्यासारखी कोसळली. २०११ मध्ये बांधलेल्या या इमारती मध्ये ४७ फ्लॅट होते. दरम्यान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास शेकडो लोक अडकल्याची शक्यता आहे. तर ३० जखमींना महाड ग्रामीण रुग्णालय आणि देशमुख नर्सिंगहोम मध्ये दाखल करण्यात आले आहे.  स्थानिक लोक जखमींना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र यंत्रणे अभावि बचाव कार्याला मर्यादा येत आहेत. या साठी एनडीआर‌एफ ला पाचारण करण्यात आले आहे. महाड अग्निशामक, एम‌आयडीसी अग्निशामक आणि एल‌एण्डटी बचाव कार्य करीत आहेत.
           बिल्डर कोहीनुर डेव्हलपर्स, यांच्या फारुक म्हामुदमिंया काझी याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजपाचे जिल्हासरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी केली आहे. नगरपालिकेने जेव्हा या इमारतीला कम्प्लीशन सर्टीफीकेट दिलेच कसे ? या विरोधात २०११ ला महामुणकर यांनी सदर इमारतीचे स्ट्रकचर आॅडीट करावे अशी मागणी केली होती. सदर इमारत ही निकृष्ट बांधाकामुळेच कोसळल्याचा आरोप होत आहे.
घटनास्थळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप हजर झाले होते.

जिल्हा प्रशासनाची माहिती आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढले असून सात जण जखमी तर एक मृत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!