पनवेल दि.०७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत आज दि. ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजण्याचे दरम्यान वायूवेग पथक क्र. ०३ मोटार वाहन निरिक्षक दिलिप दराडे यांनी मुंबई पुणे हायवे रोडवरून खारघर कडून कळंबोली कडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टोयाटो इनोव्हा चार चाकी संक्षयास्पद वाटल्याने गाडी अडवून सदर गाडीस SST पथक क्र.१२ कळंबोली चेक पोस्ट नाका यांचे कडे सुर्पत करणेत आली. सदर गाडीची तपासणी केली असता, त्या गाडीमध्ये २ लाखाची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम स्थिर सर्वेक्षण पथक क्र.१२ मार्फत जप्त करण्यात आली.
हि कारवाई १८८ पनवेले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरिक्षक, विजय फासे, सहाय्यक खर्च निरिक्षक, संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी, शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख जी.एस.बहिरम, सहा. समन्वयक आचारसंहिता कक्ष, दिनेश भोसले तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, तसेच वायूवेग पथक क्र. ०३ मोटार वाहन निरिक्षक दिलिप दराडे, स्थिर सर्वेक्षण पथक क्र.१२ पथकाचे प्रमुख प्रशांत वायचळ, सहा. पथक प्रमुख, अशोक कुमार, कोमोठे पोलीस ठाण्याचे पो.शि. गणपती पाटील, खारघर पोलीस ठाण्याचे पो.शि.भूषण चौधरी उपस्थित होते.

दिवाळी पहाट २०२४, वडाळे तलाव, पनवेल
‘दीपसंध्या’ २०२४, गावदेवी मैदान, खारघर

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!