पनवेल दि.१७: राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांना ओळखले जाते. पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा उदंड प्रतिसाद पहायला मिळत आहे.
खुटारी, रोहिंजण, किरवली, धानसर, धरणा, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले, तळोजे मजकूर, कोयनावेळे, घोट व पेंधर येथे प्रचारार्थ रॅली आली असता तेथील ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या मतदार संघाचे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी खऱ्या अर्थाने पनवेलला विकासकामांची ओळख करून दिली. ती कायम विधायक काम करत त्यांनी कामाचा झपाटा कायम ठेवला.त्यामुळे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व निर्माण झाले. कार्य कौशल्यातून पनवेलचा विकास घडवणारे, वक्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून कायम पहायला मिळते. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतानाच लोकांना अपेक्षित असलेला शहरासह ग्रामीण भागाचा विकास त्यांच्याकडून झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात विकास पहायला मिळत नव्हता. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विधानसभेचे नेतृत्व स्वीकारल्यापासून शहराबरोबरच ग्रामीण भागातही विकासकामांचा आलेख चढता राहिला आहे, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळाले.

दिवाळी पहाट २०२४, वडाळे तलाव, पनवेल
‘दीपसंध्या’ २०२४, गावदेवी मैदान, खारघर

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!