पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठीची जय्यत तयारी सुरू
पनवेल दि.८ : ठाणे, नवीमुंबई, रायगडमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः खारघर येथे जाहिर सभेस उपस्थित राहाणार आहेत.
या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 40 नेत्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील महायूतीच्या सर्व उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली असून 14 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चार दिवसांत नऊ प्रचारसभांना संबोधित करणार असून, एक रोड शोदेखील करणार आहेत. शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी धुळे आणि नाशिकमधील सभेने पंतप्रधानांच्या महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्याला सुरुवात होत आहे.
गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, रायगड आणि मुंबईतील प्रचारसभांना ते संबोधित करणार आहेत.