पनवेल दि.८: पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वस्तरांतून पाठिंबा मिळत आहे. त्यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र आज माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या पाठिंबापत्रात म्हटले आहे की, गेली १५ वर्षे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आमदार प्रशांत ठाकूर यांना लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान (महाराष्ट्र शासन नोंदणीकृत) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय अनुसया राजाराम सोनावणे यांच्या आदेशाने जाहीर पाठिंबा देत आहोत. या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांत आमूलाग्र बदल होत आहे. विकसित, प्रगतशील महाराष्ट्राकडे वाटचाल करताना आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर हे पनवेलचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे स्वप्न पाहताना मतदारसंघात अनेक विकासकामे त्यांच्या दूरदृष्टीने होत आहेत. या मतदारसंघाचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक जलद व्हावा म्हणून आम्ही या पत्राद्वारे त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत.
पाठिंबा पत्र देतेवेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे, कार्याध्यक्ष स्वराज सोनावणे, उपाध्यक्ष निलेश सोनावणे, ओबीसी सेल अध्यक्ष अ‍ॅड. मनोज म्हात्रे, सचिव अ‍ॅड. चंद्रकांत मढवी, भारतीय सेल अध्यक्ष अ‍ॅड. अरुण कुमार, उपाध्यक्ष खेमराज रावळ, शिक्षण विभाग प्रमुख सुधाकर पालकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद शेठ, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र शेठ, मागासवर्गीय सेल अध्यक्ष प्रशांत कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. ज्योती सरोदे, मीडिया सेल प्रमुख पत्रकार संजय कदम, उपाध्यक्ष शरद सोनावणे उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!