महेंद्र घरत हे मनोहर भोईर यांना निवडूण आणण्यासाठी मैदानात
पनवेलदि. ८: उरण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अधिकृतपणे दिलेल्या पाठींब्यामुळे महेंद्रशेठ घरत यांची संपूर्ण ताकद मनोहर भोईर यांच्या पाठीशी उभी राहिल्याने डबल इंजिनचा प्रचाराचा झंझावात उरण मधे पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारास मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी स्वतः महेंद्र घरत यांनी कंबर कसली असून कॉंग्रेस पक्षाची सर्वतोपरी ताकद मनोहर भोईर यांच्या पाठीशी उभी केली आहे. आज जासई येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महेंद्र घरत हे मनोहर भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसले. महाराष्ट्रातील भ्रष्ट महायुती सरकार उलथुन लावून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हा उद्देश असल्याचे महेंद्र घरत यांनी स्पष्ट केले. या प्रचारावेळी शिवसेना ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मैदानात उतरलेले दिसले. महेंद्र घरत यांच्या पाठींब्यामुळे डबल इंजिनची ताकद मिळालेले मनोहर भोईर हे हमखास निवडूण येतील असे जाणकारांचे मत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!