निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ५ लाखाची रोकड जप्त
पनवेल दि.०८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत पोलीस पथकांतर्गत दि. ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १०:०० वाजण्याचे दरम्यान पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, सहा. पोलीस आयुक्त अशोक रजपूत, पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण सोनवणे यांना मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरिक्षक विनोद लभडे व त्यांचे पथक यांनी पनवेल बावन बंगला कडून कामोठे कडून कडे जाणाऱ्या हिरो होंडा सीटी डिलक्स हि दूचाकी संक्षयास्पद वाटल्याने गाडी अडवून तपासणी केली असता. त्या गाडी मध्ये ५ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. सदरची रक्कम व संबंधितास ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी भरारी पथक (FST) क्र.०३ यांचे कडे सुपूर्त करणेत आली. सदरील रक्कम भरारी पथक (FST) क्र. ०३ मार्फत जप्त करण्यात आली.
सदर कारवाई १८८ पनवेले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरिक्षक, विजय फासे, सहाय्यक खर्च निरिक्षक, संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी, शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख जी. एस. बहिरम, सहा. समन्वयक आचारसंहिता कक्ष, दिनेश भोसले तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, तसेच पनवेल शहर पोलस ठाण्याचे पोलस उपनिरिक्षक विनोद लभडे, पोहवा अमोल पाटील, पोहवा माधव शेवाळे, पोहवा किरण सोनवणे, पोहवा अविनाश गंथडे अणि भरारी पथक क्र. ०३ पथकाचे प्रमुख निवृत्ती देवरे, सहा. पथक प्रमुख, प्रसाद पाटील, कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक वशिष्ठ कांगणे, कामोठे पोलीस ठाण्याचे पो.शि.निकेत पोकळे उपस्थित होते.