#360°videography पनवेल : साहित्य हे जगण्याला आत्मबळ देते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट समूहाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात केले. रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरात झालेल्या स्नेहमेळाव्यास कवी अरूण म्हात्रे, रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, कवी साहेबराव ठाणगे,सतीश सोलांकुरकर, कोमसाप दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, केंद्रीय वाडःमय प्रमुख सुनंदा देशमुख, केंद्रीय संमेलन प्रमुख सुधीर शेठ, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी,उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, उद्योजक प्रदिप गांधी उपस्थित होते. यावेळी रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, दक्षिण रायगड कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संजय गुंजाळ,उत्तर रायगड कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, केंद्रीय वाङमय प्रमुख सुनंदा देशमुख, केंद्रीय संमेलन प्रमुख सुधीर शेठ यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्याच्या मधुघट समूहाचे हेमंत बारटक्के यांनी वर्षभरात राबविलेल्या विविध साहित्य उपक्रमांची माहिती दिली. दुपारच्या सत्रामध्ये समूहातर्फे खुले कविसंमेलन आयोजित केले. या कवी संमेलनामध्ये कवींनी सामाजिक, राजकीय आदी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. सादर केलेल्या कवींना समूहातर्फे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ही ठेवण्‍यात आले होते. या स्नेहमेळाव्याचे संयोजन साहित्याचा मधुघट समूहाचे रघुनाथ पोवार, अजित शेडगे, हेमंत बारटक्के, सिध्देश लखमदे, श्रेयस रोडे तसेच रातवड माध्यमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांनी यांनी केले.SHOW LESS

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!