उरण दि 21(विठ्ठल ममताबादे) कोविडच्या कठीण परिस्थितीमध्ये शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत समर्पण ब्लड बँक-घाटकोपर मुंबई यांच्या सहाय्याने सलग दुसऱ्या वर्षीही रामनवमीचे औचित्य साधून कळंबुसरे-उरण येथील साई मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबीर आयोजित केले होते.शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे साई वेताळ ग्रुप ची सदस्य आरती पाटील हिने आज स्वतःच्या लग्नाच्या हळदीच्या दिवशी रक्तदान करून समाजाला एक वेगळा संदेश दिला.
या रक्तदान शिबिरात एक उत्कृष्ट डान्स कोरिओग्राफर तथा सिनेकलाकार पपन पाटील, स्टेप आर्टचे अध्यक्ष पप्पू सूर्यराव आणि 29 वेळा रक्तदान करणारे रुपेश म्हात्रे व सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांच्या सहित 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यामध्ये तब्बल 14 महिलांनीही रक्तदानाचा हक्क बजावला.
रक्तदान शिबिरासाठी स्वतःच्या बहिणीची हळद असतानासुद्धा साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, नरेश पाटील,स्वप्निल पाटील, डॉ.शैलेश पाटील, हर्षद पाटील, रणजित पाटील, अभि पाटील, शुभम पाटील, सुयोग पाटील, यतीश भेंडे, प्रतिक म्हात्रे, क्षितिज म्हात्रे, ऋतिक म्हात्रे, जितेंद्र भेंडे, विलास भेंडे, रमेश म्हात्रे, प्रभुश्वर म्हात्रे या बंधूंनी खूप मेहनत घेतली.रक्तदान शिबिरास गोवठणे विकास मंच चे अध्यक्ष सुनिल वर्तक यांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले.
सदर रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू गोर गरिबांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन यामुळे रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.