पेणमध्ये २.२५ एमव्हीए क्षमतेच्या चार्जीग सेंटरची उभारणी
भांडुप/पेण: ०४ : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे २.२५ एमव्हीए क्षमतेचे इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. पेण येथील मुंबई ते गोवा महामार्गावर जेएसडब्ल्यू कंपनीच्या गेटजवळ या चार्जिंग स्टेशनची उभारणी अल्पावधीत करण्यात आली. एकावेळी १० बसेसच्या चार्जिंगची सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे.
जेएसडब्ल्यु कंपनीने मुंबई-गोवा महामार्गावर कंपनीच्या गेटजवळ २.२५ एमव्हीए क्षमतेचे चाजींग सेंटर उभारणी करण्याचा प्रस्ताव महावितरणच्या पेण मंडळ कार्यालयाकडे सादर केला होता. वायु प्रदुषणात होणारी घट लक्षात घेऊन भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनात अल्प कालावधीत सदर प्रकल्पाला वीजजोडणी देण्याचे काम महावितरणकडून करण्यात आले. या चाजींग स्टेशनमध्ये एकाच वेळी दहा इलेक्ट्रिक बसेसना चार्जींग करण्याची क्षमता आहे. तर दिवसभरात एकूण ६१ इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग याठिकाणी होणार आहे.
पेण मंडळाचे प्रभारी कार्यकारी अभियंता (प्रशासन) रवीकिरण पाटील, पेण चाचणी विभागाचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता निलम गांगोडे, पेण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सिध्दार्थ खोब्रागडे तसेच महावितरणच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अविरत कामातून अल्पावधीत या चार्जिंग स्टेशनला वीजजोडणी दिली. जेएसडब्ल्यु कंपनी प्रशासनाने महावितरणच्या या कामाचे कौतूक करून आभार व्यक्त केले आहेत.