पनवेल दि.17: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने आज खारघर व मोहोपाडा येथे झालेल्या रक्त व प्लाझ्मादान शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

श्री. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड स्कुल खारघर येथील शिबिराचे उदघाट्न भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तर मोहोपाडा येथे भारतीय जनता पार्टी व आमदार महेश बालदी जनसंपर्क मोहोपाडा कार्यालयात झालेल्या शिबिराचे उदघाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी रक्तदान करून सर्वाना प्रेरणा दिली. खारघर येथील शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच प्लाझ्मासाठी २७जणांनी सॅम्पल दिले. मोहोपाडा येथील शिबिरात ४८ रक्दात्यांनी रक्तदान केले. 

कोरोना महासाथीचा मुकाबला करताना ‘संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा, पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येत आहेत.

खारघर येथे झालेल्या शिबिरास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती ब अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, अजय बहिरा, नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कामोठे मंडल सरचिटणीस सुशील शर्मा, उत्तर रायगड युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते. तसेच मोहोपाडा येथे झालेल्या शिबिराला युवा नेते प्रविण खंडागळे, सुनील माळी, शेखर तांडेल, डॉ. अविनाश गाताडे आदी उपस्थित होते. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!