सात लाख रुपयांच्या बक्षिसांची बरसात होणार !
पनवेल, दि.2: पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस यांच्या वतीने पनवेल विधानसभा मतदार संघ कक्षेतील सोसायट्यांकरता “स्मार्ट सोसायटी स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत यांनी आज पदाधिकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेऊन या स्पर्धेची घोषणा केली. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावंत, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अरविंद सावळेकर, महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष मोहन गायकवाड,जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे कार्याध्यक्ष ऍड अरुण कुंभार, सांस्कृतिक सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राकेश चव्हाण उपस्थित होते.
जसजशा सहकारी गृहनिर्माण संस्थाची संख्या वाढत आहे. तसतशा त्यांच्या समस्यामध्येही भरच पडत आहे. एक सुसंस्कृत उत्कृष्ट सहकारी गृहनिर्माण संस्था कशी असावी? याचे उत्तम उदाहरण शोधण्याकरिता व त्याचा आदर्श इतर संस्थानी घ्यावा, त्यामुळे सर्व संस्था, त्याचे पदाधिकारी व सदस्य यांच्यातील संबंध कसे सौहार्दाचे असावेत या सान्याची जाण अशा सहकारी गृहनिर्माण संस्थाना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्हावी या उद्देशाने
या स्पर्धेची सुरुवात आजपासून होत आहे. व ३१ मार्च २०२२ ही स्पर्धेत सहभागी होण्याची अंतीम तारीख असणार आहे. या एक महिन्याच्या कालावधीत सोसायटी किंगडमचे प्रतिनिधी प्रत्येक संस्थेत जाऊन या स्पर्धेत सहभागी होण्याबद्दल पत्रकाद्वारे जागृती करतील, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ठरविलेल्या निकषांबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करून दिले जातील,
३१ मार्च २०२२ला स्पर्धेतील प्रवेशाची मुदत बंद होईल १ एप्रिल २०२२ ते १५ एप्रिल २०२२ या कालावधीत सोसायटी किंगडमने नियुक्त केलेले परिक्षक एका प्रश्नावलीच्या आधारे संस्थांची पाहणी करतील त्यानंतर मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिन या दिवशी स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारंभ करण्यात येईल (कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे / आचार संहितेमुळे या तारखेत बदल होऊ शकतो.)
या स्पर्धेत सहभागी होणा-या संस्थाकरिता सभासद संख्येनुसार गट पाडले जातील ‘अ’ गट यामध्ये ५० सदस्य संख्या असणाऱ्या संस्था ब गट- यामध्ये ५१ ते १५० सदस्य संख्या असणाऱ्या संस्था व क गट यामध्ये १५१ पेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या संस्था अशी गटवार विभागणी असेल.
शिवाय पनवेल नवनि पनवेल खादा कॉलनी (आसूडगावसह) कळंबोली कामोठे खारगर व नावडे, तळोजा फेज १ व २ (प्रभाग १ व २) ही सात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शहरे याशिवास ४ जिल्हा परिषद हद्दीतील व पनवेल विधानसभा क्षेत्रातील आदई, विचुबे, उसल, सुकापूर, आकुर्ली, कोपोली, नेरे, करंजाडे, पळस्पे इ. नागरी वस्त्या असणारी गावे असे एकूण ८ विभागांकरिता स्वातंत्रपणे स्पर्धा असणार आहेत. प्रत्येक विभागवार रोख रक्कमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
www.smartsocietyawards.com
landline – 022 4603 7647