पनवेल दि.२१: स्वच्छता हि सेवा आणि कर्तव्य आहे, त्यामुळे सर्वांनी भविष्याचा विचार करून स्वच्छतेचे महत्व अंगिकारले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. निसर्गमित्र पनवेलच्या वतीने ‘गाढी नदी वाचवू या’ उपक्रमांतर्गत आज चिपळे येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ‘निर्माल्य कलश’ चा लोकार्पण करण्यात आले. नदीची स्वच्छता व नदीत कचरा, निर्माल्य पडू नये, यासाठी लोकांना पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सौजन्याने गाढी नदीवरील चिपळे पुलाजवळ निर्माल्य कलश बसविण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तेटगुरे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, निसर्गमित्रचे संस्थापक धनंजय मदन, अध्यक्ष सचिन शिंदे, सुरेश रिसबूड, किशोर म्हात्रे, यांच्यासह विभागातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते, निसर्गमित्र उपस्थित होते.