पनवेल दि.२२: भारताची आवश्यकता असलेल्या नागरीकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शनिवार पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामान्य नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विविध सामाजिक संस्थेचे सदस्य आणि नागरीकांनी उपस्थित राहन जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सिटीझनशीप अॅमेंडमेंट अॅक्टच्या समर्थनार्थ शनिवारी सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने जमून जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले. धर्म, प्रांत या आधारावर देशात फूट पाडण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आणि देशाच्या एकतेला बळ देण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विविध सामाजिक संस्थांनी नागरिकांना एकत्र येण्याची हाक दिली होती. या हाकेला साद देत नागरिक मोठया संख्येने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकर, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.